सांगली-सांगलीत विवाहित महिलेने आपल्या तीन मुलांना घेऊन विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. महिलेने विहिरीत उडी मारल्याची माहिती मिळताच त्यांचा शोध सुरु झाला होता. अखेर चार तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
30 वर्षीय राधिका सुभाष कोळी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. राधिका कोळी यांनी आपल्या तीन मुलांसह मध्यरात्री यल्लम्मा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. राधिका कोळी यांच्यासहित त्यांची मुलं हर्षल (4), प्रज्वल (3) आणि चिताका (2) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाली असावी असा संशय व्यक्त केली आहे. विहीर खोल असल्याने बराच वेळ मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. चार तासानंतर मृतदेह हाती लागले. दरम्यान या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.