तीन रेल्वे गाड्यांमध्ये चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास

0

चोरट्यांची सुसाट एक्स्प्रेस : रेल्वे प्रवाशांची गर्दी चोरट्यांच्या पथ्थ्यावर

भुसावळ- रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी चोरट्यांच्या पथ्थ्यावर असून तीन गाड्यांमध्ये झालेल्या चोर्‍यांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. रेल्वे लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाची गस्त नावालाच आहे की काय? असा प्रश्‍न संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत.

लाखोंच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला
डाऊन जनता एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या देवेंद्रकुमारसिंह शिवप्रसादसिंह (रा.रेपुरा, मुजफ्फरपूर, बिहार) यांची 4 जून रोजी बॅग चोरीला गेली. बॅगेत 70 हजारांच्या रोकडसह दागिने मिळून 94 हजारांचा मुद्देमाल होता. भुसावळ स्थानक सुटल्यानंतर ही चोरी झाली. तपास हवालदार शाम बोरसे तपास करत आहे. अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवासी शेख सुलतान शेख फकिरा (रा.पॅराडाइॅज कॉलनी, अमरावती) हे 7 जून रोजी एस-3 डब्यातील सीट क्रमांक 25 वरून प्रवास करत असताना चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. तपास हवालदार रामराव इंगळे करत आहेत. तिसर्‍या घटनेत कुशीनगर एक्स्प्रेसच्या एस-6 डब्यातील प्रवासी अ‍ॅड. कविता केवट (रा. पंधरा बंगला, भुसावळ) यांना झोप लागल्याने चोरट्यांनी त्यांची पर्स लांबवली. त्यात दोन हजार रूपये रोख व इतर ऐवज होता.