तीन लाखांसाठी विवाहीतेचा छळ; सासरच्यांविरूद्ध गुन्हा

0

धुळे । येथील मोहाडी गावाचे माहेर असलेल्या विवाहीतेचा तीच्या सासरच्या लोकांनी तीन लाख रूपयासाठी गेल्या अनेक वर्षापासुन मानसिक व शारिरीक छळ केला होता. दरम्यान त्या त्रासाला कंटाळून विवाहीताने दि.8 रोजी सासरच्या लोकांविरूद्ध मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील मोहाडी परिसरात राहणार्‍या प्रतिभा प्रमोद पाटील वय 26 ह्यांना सासरच्या लोकांनी तुझ्या माहेरून तीन लाख रूपये व्यवसाय करण्यास आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन छळ करून मानसिक व शारिरीक त्रास सुरू होता. दरम्यान या त्रासाला कंटाळून शेवटी प्रतिभा पाटील यांनी प्रमोद निंबा पाटील (पती),निंबा पाटील (सासरे),लताबाई निंबा पाटील (सासू), राजश्री सतिष पाटील (ननंद), साहेबराव काशिनाथ पाटील,भिकु साहेबराव पाटील,ओनम राकेश पाटील सर्व रा.सुरत या सातही जनाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.