फैजपूर मुख्याधिकारी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात झाल्या भावूक
फैजपूर- मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांनी फैजपूर पालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरात शहर विकासाच्या महत्वाच्या कामांसह अतिक्रमित व्यापारी संकुल गाळे पाडण्यासह स्वच्छ व सुंदर शहर, हगणदरीमुक्त शहर तसेच कर वसुली शंभर टक्के करण्याचा ध्यास घेवून त्यांनी तीन वर्षात कर्तव्य कठोर, अशी उत्कृष्ठ कामगिरी निभावली. त्यांची मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील पालिकेत बदली झाल्याने बुधवारी पालिका सभागृहात नगरसेवक व कर्मचारी यांच्या तर्फे निरोप समारंभ देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की, फैजपूर शहराला विकासाच्या उंबरठ्यावर नेण्यासाठी विधायक कामे करण्याचे भाग्य मला तीन वर्षात लाभले तसेच चांगले कामे करून चांगल्या आठवणी घेवून चालली असल्याचे त्या म्हणाल्या. या पालिकेत काम करतांना नगरसेवक, कर्मचारी आणि नागरीक यांच्या सहकार्याने मी शहराचा विकास करू शकली असल्याचेही त्या म्हणाल्या.
यांची होती उपस्थिती
फैजपूर पालिकेत आता निफाड येथून किशोर चव्हाण बदलून येणार असून गुरुवारी ते पदभार घेण्याची शक्यता आहे तर निरोप समारंभ समयी माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, मिलिंद वाघूळदे , डॉ.इमराम शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार लेखापाल संजय बाणाईते यांनी मानले. नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष कलीम खां मन्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान, नफीसा इरफान, फातेमा रईस, शाहीन परवीन, शकील खान, वत्सला कुंभार, नगरसेवक रशीद तडवी, देवेंद्र बेंडाळे, प्रभाकर सपकाळे, अमोल निंबाळे मनोज कापडे, पत्रकार वासुदेव सरोदे, निलेश पाटील, योगेश सोनवणे, समीर तडवी व पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.