तीन वर्षीय मुलीचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

0

जळगाव– येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल तीन वर्षीय मुलीला कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तीचा स्वॅप नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

धुळे महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या मुलीचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी कळविले आहे.