कार्डिफ । टि-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात 19 धावांनी इंग्लंड विजय मिळवून टि-20 मालिकेवर आपले नाव कोरले. डेविड मिलान याने आपल्या पहिल्या सामन्यात खेळतांना 78 धावा केल्या. तर इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भोदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.इंग्लंडने तीन सामन्याच्या टि-20 मालिकेत 2-1 विजय नोदवित चषकवर आपले नाव कोरले. नाणेफेक दक्षिण आफ्रिकेने जिकून इंग्लंड संघाला फलंदाजीला निमंत्रण दिले.
दक्षिण आफ्रिका 162 गारद
इंग्लंड निर्धारित 20 षटकात दक्षिण आफ्रिकेला 182 धावांचे लक्ष्य दिले. 182 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकात 7 फलंदाज गमवून 162 धावा करू शकला.इंग्लंडच्या संघासाठी खेळतांना मिलान बरोबर एलेक्स हेल्स याने 36 धावा केल्या तर कर्णधार जॉस बटलर ने 31 धावांचे योगदान दिले. याशिवाय संघाचा कोणताही फलंदाज हा 10 चा आकडा पार करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून पीटरसन याने चार फलंदाजाना बाद केले.एडिले फेहुलुकवायो ने दोन फलंदाज तर मोर्ने मोर्केल, इमरान ताहिर यांनी एक-एक फलंदाज बाद केले. 182 धावांचा पाठलाग करणार्या दक्षिण अफ्रिका संघाची सुरवात चांगली झाली नाही. 91 धावांवर त्याचे 6 फलंदाज तंबूत परतले होते.या सामन्यात मंगालिसो मोसेहल याने 36 धावा तर कर्णधार अब्राहम डिविलियर्सने 35 धावा केल्या. इंग्लंडकडून क्रिस जोईन सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले. टॉम कुरान दोन, तर लियाम प्लंकेट व मोसोन क्राने यांनी एक-एक फलंदाज बाद केले.या सामन्याचे समनावीर पुरस्कार हा इंग्लंड टि-20 खेळात पर्दापण करणार्या मलान याला देण्यात आले.