अमळनेर- वारस दाखल्यावर नाव लावण्यासाठी तीन हजारांची लाच घेणार्या अमळनेर भूमापन विभागातील निमताणदार महेंद्र दत्तात्रेय म्हस्के यांना आज बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्यांनी ही कारवाई केली. महिनाभरात पाचव्या लाचखोरांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे.