साध्वीजीश्री निर्वाणश्रीजी यांचे विचार ; भुसावळात धार्मिक कार्यक्रम
भुसावळ- तीर्थंकर परंपरेत 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते कारण तीर्थंकरांच्या जेव्हढ्या स्तुती आहेत त्या सर्वांचे नायक भगवान पार्श्वनाथ आहेत, असे विचार प.पू.स्वाधीजीश्री निर्वाणीश्रीजी आदी ठाणा- 6 यांनी येथे व्यक्त केले. शहरातील तेरापंथ भवनात नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित भगवान पार्श्वनाथ जन्म कल्याणक या विशेष कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसंगी साध्वी योगक्षेमप्रभा यांनीदेखील भाविकांना विविध दाखले देत मार्गदर्शन केले. प्रसंगी सामूहिक रूपाने नवग्रहाची स्तुती सादर करण्यात आली.
स्वरांनी भाविकांना केले चिंब
प्रसंगी चेन्नईहुन आलेले गायक नवीन बोहरा, साकरीचे भूषण कांकरीया, जालन्याचे दीपक संचेती यांनी स्वरांनी उपस्थित भाविकांन मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान पार्श्वनाथ यांच्या स्तुतीने करण्यात आली. स्थानीय युवती मंडळ, कन्या मंडळ आणि जळगावच्या भिक्षु भजन मंडळी यांनी सामूहिक गीते सादर केली. सूत्रसंचालन प्रबुद्ध साध्वी योगक्षेमप्रभा यांनी केले.