तीर्थक्षेत्र देहूगाव येथे स्वच्छता अभियान

0

देहुरोड : तीर्थक्षेत्र देहुगाव येथे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीतर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन या अभियानास सुरूवात करण्यात आली. यावेळी सुमारे दोन टन कचरा संकलित केला. स्वच्छतेची सुरूवात सरपंच सुनीता टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी इंद्रायणी नदी परिसरासह गाथा मंदिर रोड, नदी घाट परिसरात स्वच्छता केली. पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, देहूचे उपसरपंच संतोष हगवणे, मराठवाडा जन विकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, माधव मनोरे, नामदेव पवार, माजी ग्रामपंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे, शिवसेनेचे सुनील हगवणे, इंद्रायणी नदी स्वच्छतेचे सोमनाथ मुसुडगे, अंकुश मुसुडगे, अहिल्यादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, अ‍ॅड. महेश घोडके आदी उपस्थित होते.

यावेळी हेमालता काळोखे म्हणाल्या, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टने देहूत केलेले स्वच्छता अभियान स्तुत्य आहे. माधव मनोरे म्हणाले, पर्यावरण समतोल राखण्यासाठी स्वच्छतेसाठी पर्यावरणपूरक कार्य करणे, ही काळाची गरज आहे. केशव अहिवळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र गाडेकर यांनी आभार मानले.