तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराच्या कामाचा श्रीगणेशा
नागेश्वर महादेव मंदिर देवस्थान जिल्ह्यात एक नंबरचे तीर्थक्षेत्र होणार : सहकारमित्र चंद्रकांत बढे सर
वरणगाव : शहरातील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून दोन कोटी 74 लक्ष रुपये मंजूर करून दिले होते. यासाठी माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांचाही पाठपुरावा मोलाचा ठरला होता. रविवारी सोशल डिस्टन्स राखत मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या परीसराच्या कामाचा श्री गणेशा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे सर यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ट्रस्टचे बी.एम.पाटील, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष माळी, भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, मिलिंद भैसे, पप्पू ठाकरे यांची उपस्थिती होती.
ही कामे होणार
एकूण दोन कोटी 74 लक्ष रुपयांच्या निधीतून सभा मंडप, फेव्हर ब्लॉक , शौचालय, बगीचा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तीर्थक्षेत्र, नागेश्वर मंदिर ते रेस्ट हाऊस वरणगावपर्यंत रस्ता रुंदीकरण, दुभाजक, लाईट या कामांचा समावेश आहे. भरीव निधीतून तीर्थक्षेत्र क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर हे जिल्ह्यात नंबर एकचे होणार आहे. तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे यासाठी मी ज्यांना-ज्यांना भेटलो त्यांनी गांभीर्याने ही बाब घेतली नाही मात्र सुनील काळे हे नगराध्यक्ष झाले आणि वरणगाव शहरात विकासाची गंगाच अवतरली. तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर जिल्ह्यात नंबर एकच असेल, असा आशावाद ट्रस्टचे अध्यक्ष सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर यावेळी म्हणाले.
अ दर्जा देण्याची अपेक्षा
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराला शासनाने तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा द्यावा यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मागणी करणार आहे. सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सरांच्या संकल्पनेतून वरणगाव शहर आकारास येत आहे. यापुढे सुद्धा विकासासाठी अंतिम श्वाश्वापर्यंत लढत राहू , असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.