तीस वर्षांनी फुलला महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांचा कट्टा
`चला विसावू या वळणावर` माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात
जळगाव – सुमारे तीस वर्षाचा कालावधी फार मोठा आहे, याकालावधीत शिक्षण घेऊन एकमेकांपासून दुर झालेले मित्र जेव्हा एकमेकांना भेटातात तो आनंद शब्दातीत आहे. असाच रोमांचक आनंद अनुभवला तो `चला विसावू या वळणावर` या महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनातील विद्याथ्र्यांनी आणि माजी प्राध्यापकांनी.
महाविद्यालयीन विद्यार्थी काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आठवणीतील रम्य ठेवा असतो, सळसळते तारुण्य, नुकतेच माध्यमिक शिक्षणातुन महाविद्यालयीन प्रांगणात ठेवलेले पाऊल, नवनविन मित्र-मैत्रिणीमुळे हा कालावधी प्रत्येकास सुखावणारा असतो. महाविद्यालयीन शिक्षणानंतर क्वचितच या माजी विद्याथ्र्यांची भेट होते. मात्र सुमोर तीस वर्षानंतर जर एकाचवेळी सर्व माजी विद्यार्थी भेटणे तसे दुर्मीळच. हा योग घडून आला तो चला विसावू या वळणार या स्नेहसंमेलनात.
नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे सन 1989 ते 1993 दरम्यान वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या माजी महाविद्यालयीन विद्याथ्र्यांच्या स्नेहमिलनाचा `चला विसावू या वळणावर` हा कार्यक्रम विद्यापीठाच्या मागील हनुमंत खोरे येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात सत्तरच्या वर माजी विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपल्या जीवनात स्थिरस्थावर झालेले विद्यार्थी कोणी व्यवसायात यशस्वी तर कोणी नोकरीतल उच्च पदस्थ अधिकारी पदावर पोहचलेले मात्र या वेळी सर्वजण मित्र एक सारखेच असल्याने प्रत्येक जण आपल्या मागील आठवणीबद्दल बोलत होते. याप्रसंगी या विद्याथ्र्यांना शिकविणा·या शिक्षकांचा सपत्नीक यथोचित सन्मान करण्यात आला. शिक्षकांनीही आपल्या विद्याथ्र्यांबद्दली गौरवोद्गार काढलेत.
कार्यक्रमाचे संचलन सुनंदा सोमाणी यांनी केले. प्रास्ताविक स्नेहसंमेनालचा समन्वक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले तर आभार अनिल वाणीने केले. आर.के. सोमाणी, प्रशांत कापूरे, योगेश सुमेर, रविंद्र धुमाळ, तरन्नमू चित्रे, आरती वेद समवेत सत्तरच्या वर विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला.
माजी विद्यार्थी ही महाविद्यालयांची मौल्यावान बौद्धीक संपत्ती :
विद्याथ्र्यांच्या सत्कार प्रसंगी बोलतांना स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. एस.आर. सोनवणे यांनी सांगितले की, आपल्या बुद्धीप्रामण्याच्या जोरावर केवळ महाविद्यालयीन शिक्षणात यशस्वी होऊन नाव कमविणा·या विद्याथ्र्यांबरोबर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले व आपल्या व्यवसायात व नोकरीवर यशस्वी झालेल्या व महाविद्यालयाचे नाव उज्वल करणारे माजी विद्यार्थी ही खरी महाविद्यालयांची मौल्यावान बौद्धीक संपत्ती असते, आहे असे प्रतिपादन प्रा. एस.टी. सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी प्रा. एस.आर. सोनवणे यांचे बरोबर माजी विद्याथ्र्यांना शिकविलेल्या प्रा. बी.टी. सुर्यवंशी, प्रा. दिनकर पवार, प्रा. दिलीप निकम, प्रा. लाठी या माजी शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, त्यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.