मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत बदलत आहे, वेगवेगळ्या विचारसरणीचे चित्रपट पाहायला मिळत आहे. आता अशाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तो म्हणजे ‘ती अॅण्ड ती’. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
All set for 1 March 2019 release… Pushki [Pushkar Jog], Sonalee and Prarthana Behere… Motion poster of #Marathi film #TiAndTi… Directed by Mrinal Kulkarni… Produced by Anand Pandit, Pushkar Jog and Mohan Naddar… Filmed extensively in #London. pic.twitter.com/OG7oIpyqLl
— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2019
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये पुष्कर जोग, प्रार्थना बेहेरे आणि सोनाली कुलकर्णी दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णीने केले असून निर्माते आनंद पंडित, पुष्कर जोग आणि मोहन नादार आहेत.