ती केवळ माझी मैत्रीण किंवा गर्लफ्रेंड नसून होणारी पत्नी आहे – वरुण धवन

0

मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोला प्रेक्षकांची फार पसंती मिळत आहे. यात करण जोहर अनेक स्टार्सच्या खासगी आयुष्याबद्दलचे खुलासे करत असतो. नुकताच करणच्या शोमध्ये वरुण धवनची येऊन गेला.

वरुण धवन नेहमी एका मुलीसोबत दिसत असतो जिचे नाव नताशा दलाल असे आहे. नताशाला वरुणच्या कुटुंबासोबत बऱ्याचवेळा स्पॉट करण्यात आले.
‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये वरुणने ती केवळ माझी मैत्रीण किंवा गर्लफ्रेंड नसून होणारी पत्नी आहे, असे सांगितले. तसेच तो लवकरच तिच्यासोबत लग्न करणार आहे. माहितीनुसार, या दोघांचे नाते त्यांच्या कुटुंबालाही ठाऊक आहे. वरुणच्या बऱ्याच फॅमिली फंक्शनमध्ये तिची उपस्थिती असते. वरुण आणि त्याच्या कुटुंबाकडून हे नाते स्विकारले असल्याचे सांगितले जात आहे.