तुकोबांच्या पालखी रथासाठी 13 अर्ज

0

देहुरोड : आषाढी वारीसाठी पुढील महिन्यात 5 जुलै रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे. या पालखी रथ ओढण्याचा मान आपल्या बैलांना मिळावा, यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानकड़े 13 बैल मालकांनी व चौघडा गाडीसाठी एका बैलजोडी मालकाने अर्ज केला आहे. रथासाठी लागणार्‍या बैलांची उंची, त्यांची शिंगे, वशिंड याची पहाणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बैलजोडी मालक मानकरी निश्‍चित केला जाणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख सुनिल दामोदर मोरे यांनी दिली. संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख विठ्ठल मोरे, अशोक मोरे, विश्‍वस्त सुनिल दिगंबर मोरे, अभिजीत मोरे, जालिंदर मोरे, दिलीप मोरे, सदाभाऊ मोरे यावेळी उपस्थितोते.

अधिक महिन्यामुळे उशीर
श्री संत तुकाराम महाराज आषाढ वारी 333 वा पालखी सोहळा यावर्षी अधिक महिन्यामुळे एक महिना उशिरा होत आहे. पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून कुरुळी, ता. खेड येथील बाळासाहेब सोपान कड, चिखली, टाळगाव, ता. हवेली येथील गणेश नारायण भुजबळ, नवलाख उंब्रे, ता. मावळ येथील दत्तात्रय धोंडीबा बधाले, ताथवडे, ता. मुळशी येथील वि. वि. नवले, लोहगाव, ता. हवेली येथील सुरज ज्ञानेश्‍वर खांदवे पाटील, माण, ता. मुळशी येथील प्रणव दशरथ शेळके, लोणी काळभोर, ता. हवेली येथील सूर्यकांत सुभाष काळभोर, बाणेर येथील बाबूराव चिंधू विधाते, आव्हाळवाडी, ता. हवेली येथील नारायण गुलाब आव्हाळे, आंबेगाव, ता. हवेली येथील रविंद्र बाळासाहेब कोंढरे, वाल्हेकरवाडी, ता. हवेली, पिंपरी चिंचवड येथील प्रदीप वाल्हेकर, धामणे, ता. मावळ येथील रुपेश गराडे, वाकड, पिंपरी चिंचवड येथील ज्ञानेश्‍वर उध्दव शेडगे व तुकाराम शेडगे यांनी अर्ज दाखल केले आहेत. देहुगाव, ता. हवेली येथील अमोल नामदेव काळोखे यांनी चौघडा गाडी ओढण्याचा मान आपल्या बैलांना मिळावा, यासाठी अर्ज केला आहे.