वीज कंपनीच्या गलथान कारभाराविरुद्ध संताप
भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा शिवारात शेतीकाम करीत असलेल्या धम्मपाल मुरलिधर इंगळे (32, चारठाणा) यांना तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकृष्ण वामन पाटील यांनी खबर दिली. तपास हवालदार सुधाकर शेजोळे करीत आहेत. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे मजुराचा बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.