तुमचा 7/12 आजच तपासा, त्रुटी सुधारण्यास मोठी संधी

0

मुंबई । महाराष्ट्रातील जमीनधारकांच्या संरक्षणसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारने 7/12 दुरुस्ती आणि चावडी वाचन विशेष मोहीम सुरु केली आहे. आपल्या सात बार्‍यात काही घोळ करण्यात आला असेल तर तो तात्काळ लक्षात यावा आणि दुरूस्ती व्हावी, यासाठी ही मोहीम आहे. यानुसार ऑनलाईन सात-बारा उतारा योग्य आहे का हे हीींिीं://ारहरलर्हीश्रशज्ञह.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप/ या वेबसाईटवर पहाणे शक्य होणार आहे.

1 ऑगस्टपासून डिजीटल स्वाक्षरीत 7/12 मिळणार
जर उतार्‍यात काही त्रुटी असतील तर 1 मे 2017 ते 15 मे 2017 पर्यंत गावातील तलाठ्याशी संपर्क साधता येणार आहे. यानंतर 15 मे 2017 ते 15 जून 2017 पर्यंत संगणीकृत 7/12 चे चावडी वाचन होईल. यामध्येही काही आक्षेप असल्यास, गाव तलाठीशी संपर्क साधा. 16 जून ते 31 जुलै 2017 पर्यंत संगणकीकृत 7/12 मधील माहितीत प्राप्त आक्षेपांचा विचार करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतील. 1 ऑगस्टपासून डिजीटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध होतील. त्यासाठी तुम्हाला चावडीत/ग्राम पंचायतमध्ये किंवा तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसेल. त्यामुळे सरकारने सर्व नागरिक आणि शेतकरी यांना आवाहन केले आहे की, मोबाईलवर, महा ई सेवा केंद्र, सायबर कॅफे या ठिकाणी महाभूलेख या वेबसाईटवर आपण आपला सातबारा तपासावा. काही त्रुटी असतील तर तातडीने तलाठ्याच्या निदर्शनास आणून द्या, म्हणजे तो सातबारा दुरुस्त करता येईल.

गेल्या नऊ महिन्यांपासून तयारी
सध्या काही जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा दिला जात नाही. दफ्तरातील सातबारा आणि संगणकावरील सातबारा यामध्ये थोडी तफावत असल्याने 7/12 नाहीत. त्यामुळेच सार्वत्रिक ऑनलाईन सात-बारा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठीच एडिट मोडूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने याच कामात गेल्या नऊ महिन्यांपासून व्यस्त आहेत.

तलाठ्याकडच्या चकरा बंद
आता सर्वच जिल्ह्याची एडिटची सरासरी टक्केवारी 80 टक्के झाली आहे. 20 टक्के राहिलेले काम झाले की सर्व सातबारे ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही. ऑनलाईन पैसे देऊन किंवा महा ई सेवा केंद्रातून डिजीटल सहीचा वैध कायदेशीर सात – बारा मिळेल.