तुमच्याकडे दुसरं काम नाही का? – स्वरा भास्कर

0

मुंबई : स्वरा भास्करने क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांची पाठराखण केली आहे. मूर्ख असणे हा काही गुन्हा नाही असं म्हणत स्वराने दोघांचा सपोर्ट केला.

‘कॉफी विथ करण’मध्ये हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने महिलांप्रती केलेल्या हीन वक्तव्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचसंदर्भात स्वराने ट्विट केले आहे. ‘मी कट्टर स्त्रीवादी आहे. पण खरंच मूर्ख असणे हा काही गुन्हा नाही आणि आपल्या देशाच्या कोर्टाकडे बाकी काही काम नाही का,’ असं स्वराने ट्विटमध्ये म्हटले आहे.