तुर खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

0

चाळीसगाव। यंदा शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात तुरीचे उत्पन झाले आहे. शासनाने हमी भावाने तूर खरेदी करण्याचे आदेश तुर खरेदी केंद्रांना दिले आहे. असे असतांना चाळीसगावात पाहिजे त्या प्रमाणावर तूर खरेदी होताना दिसत नाही व बारदानाचा तुटवडा भासवून आणि तूर खरेदी केंद्रावरचे अधिकारी,कर्मचारी हे कुठल्या तरी बहाण्याने तूर खरेदी करणे टाळत असल्याने शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी गुरुवारी 20 रोजी घाट रोड वरील वखार महामंडळाच्या गोडावुन येथे रयत सेने च्या वतीने लवकरात लवकर तुर खरेदी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले. शासकीय तूर खरेदी केंद्रावर टाळाटाळ करून पाच हजार पन्नास रुपये किमतीची तूर मार्केट मध्ये व्यापार्‍यांना तीन हजार रुपये किमतीने विक्री करण्यास शेतकर्‍यांना भाग पाडले जात असल्याचे दिसून येते.

6 मार्च पासून तूर खरेदी सुरु होती त्या दिवसात व्यापार्‍यांची तूर जास्त प्रमाणात मोजली गेली. 31 मार्च पासून शासकीय खरेदी केंद्रा मार्फत मोजला गेलेल्या मालाची रक्कम शेतकर्‍यांना त्वरीत देण्यात यावी. ंंंंअसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गणेश पवार, पी.एन पाटील, संजय कापसे, दिपक राजपूत, देवेंद्र पाटील, पंकज पाटील, मयुर चौधरी, विलास मराठे, अनिल पाटील, अभिमन्यु महाजन, नाना कापसे, गणेश देशमुख, केशव देवरे, सुनिल निबाळकर, सागर धुमाळ, सागर गायकवाड, विकास बागड, योगेश पाटील, गणेश देशमुख, महादु भिल, दिनकर कासार, ज्योती जैन, वाय.एन.पाटील, रसीद अजिज, मीराबाई पवार, अशोक चौधरी, ठानसिंग राजपुत आदी उपस्थित होते.