चोपडा। शासनाने तुर खरेदी केंद्रावर बंदी घातल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बारदान अभावी नाफेड खरेदी केंद्राच्या कुचकामी धोरणामुळे तूर खरेदी केली जात नाही. यामुळे व्यापार्यांकडून कमी भावात तूर खरेदी केली जात आहे. शनिवारी 29 रोजी चोपडा येथे कॉग्रेस कार्यकर्त्यांनी तुर खरेदी बंदी आणि पेट्रोल दर वाढच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. तहसिल समोर राष्ट्रीय कांग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांचासह कार्यकत्यानी नायब तहसिलदार डॉ. स्वप्नील सोनवणे यांना मागणीचे निवेदन दिले.
तुरीचा पेरा वाढावा म्हणून प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्यात आल्या. त्याने उत्पादनात वाढ झाली. शासनाने पेट्रोलची दरवाढ केली आहे ही दरवाढ जनतेचे कंबरडे मोडणारी आहे. तरी पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर सुरेश पाटील, संजीव बाविस्कर, राजाराम पाटील, नंदकिशोर सांगोरे, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, चुडामण पाटील, अॅड.एस. डी. सोनवणे, अशोक साळूंखे, राजेंद्र पाटील, अॅड. संदेश जैन, मुख्तार अली, आरीफ सिदीकी, आदींच्या स्वाक्षर्या आहेत.