तुळशीच्या रोपांचे वाटप; अनोखा उपक्रम

0

येरवडा । समस्त हिंदू आघाडी, युवा सेवा संघ व अखिल विश्‍व हिंदू महासंघातर्फे तुळशीच्या रोपांचे वाटप व पूजन करुन नववर्षाला अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम येरवडा येथील जयजवान नगर येथील श्रीकृष्ण मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

नाताळ आणि नववर्षानिमित्त दारू, नशा, बीभत्स नृत्य अशा विविध पद्धतींचा अवलंब सेलिब्रेशन करीता केला जातो. परंतु युवा सेना संघाच्या माध्यमातून तरुण-तरुणींसह महिलांनीही एकत्र येऊन तुळशी मातेचे पूजन केले. तसेच यावेळी तुळशीचे महात्म्य सांगण्यात आले. यावेळी युवा सेवा संघाचे विपुल खुरपे, उत्कर्ष शर्मा, गुरुनाथ, समस्त हिंदू आघाडीचे बाळासाहेब विश्‍वासराव, किसन पाटील, अशोक चव्हाण, अनिल झेंडे, आशिष वरगंटे, सुरज रजपूत, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.