तृणमूल कॉंग्रेसला आज २१ वर्ष पूर्ण; ममता बॅनर्जी यांनी दिल्या शुभेच्छा

0

नवी दिल्ली-पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल कॉंग्रेसला आज २१ वर्ष पूर्ण झाले. आज २२ व्या वर्षात पक्ष पदार्पण करणार आहे. १ जानेवारी १९९८ ला तृणमूल कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाध्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्ष कार्यकर्ते व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षासाठी ३६५ दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार देखील मानले आहे.

सुरुवातीला ममता बॅनर्जी ह्या कॉंग्रेसच्या सदस्य होत्या. त्यानंतर त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी तृणमूल कॉंग्रेस नावाच्या पक्षाची स्थापना केली. २०१६ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली.

२००९ मध्ये तृणमूल कॉंग्रेस लोकसभेत १९ जागा जिंकत देशातील चौथा पक्ष ठरला. २०१४ मध्ये देखील ३४ जागा जिंकत लोकसभेत चौथा पक्ष ठरला आहे.