तृतीयपंथीयांची दादागिरी ; पैसे न देणार्‍या प्रवाशावर केला हल्ला

0

‘महानगरीतील’ घटना ; रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने तृतीयपंथी जाळ्यात

भुसावळ– अप महानगरी एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडून बळजबरीने पैसे वसुल करणार्‍या तृतीयपंथीयांना विरोध केल्याने एकाने रेल्वेतील ट्यूबलाईट काढून प्रवाशाच्या मांडीवर मारून दुखापत केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास भुसावळ आऊटरवर घडली. या प्रकारानंतर तृतीयपंथीयांनी भादली रेल्वे स्थानकावर पळ काढला तर याबाबतची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला कळताच स्थानक निरीक्षक व्ही.के.लांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी तातडीने भादली रेल्वे स्थानक परीसरातून तृतीयपंथीयांच्या मुसक्या आवळल्या.