मुंबई- सर्व वयोगटातील महिलांना शबरी माला मंदिरात प्रवेश देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे स्वागत तर होत आहे परंतु विरोधही होत आहे. दरम्यान महिला अधिकार कार्यकर्ते तृप्ती देसाई ह्या शबरी माला मंदिरला भेट देणार असून मंदिरात प्रवेश करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचे पालन केले असल्याने शबरी माला मंदिरास भेट देणार आहोत लवकरच तारखेची देखील घोषणा केली जाईल असे तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.