सावदा। सावदा येथील विजया बँकेतर्फे मागील वर्षी तेजश्री विकास बावणे या विद्यार्थिनीस मुलगी दत्तक योजने अंतर्गत दत्तक घेऊन तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार होती. याच अंतर्गत नुकतीच तेजश्री हिस सलग दुसर्या वर्षी 5 हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सदर धनादेश बँकेच्या अधिकार्यांनी हा धनादेश तीच्याकडे सुपूर्द केला हे पैसे तिच्या शैक्षणिक कामी खर्च होणार आहे.
विद्यालयातर्फे करण्यात आले कौतुक
तेजश्री ही येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी असून तिचे अभिनंदन मुख्याधिकारी अमोल बागुल तसेच शाळेचे शिक्षकवृदानी केले आहे तर बँके तर्फे देखील तिचे अभिनंदन करण्यात आले.