जळगाव : ईस्ट खान्देश एज्यु. सोसा. संचलित आर. आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची खो-खो खेळाडू तेजस्विनी जाधव हिने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेंत सुवर्ण पदक पटकविले. तेजस्विनीने राष्ट्रीय स्तरावर दुसर्यांदा महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधीत्व केले आहे. सांगली येथे झालेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेंत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सुवर्ण पदक पटकविले. तेजस्विनीच्या यशाबद्दल आमदार स्मिता वाघ यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
तामिळनाडू संघाचा पराभव
या स्पर्धेंत साखळी सामन्यात उत्तराखंड, केरळ, तेलंगणा, उपान्तपूर्व फेरीत विद्याभारती तर उपान्त्यफेरीत कर्नाटक संघाचा पराभव करून अंतीम सामन्यात तामिळनाडू संघाचा पराभव करत स्पर्धेंचे सुवर्णपदक प्राप्त केले. तिला महाराष्ट्र प्रशिक्षक प्रशांत पवार, राजेंद्र सावते, जिल्हा कार्यालयाचे खो-खो मार्गदर्शक गुरूदत्त चव्हाण तसेच क्रीडा शिक्षक जयांशु पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. तेजस्विनीच्या सत्कारप्रसंगी शिक्षकांनी अभिवादन केले.