तेजस्वींच्या सुरक्षा रक्षकांची मुजोरी

0

पाटणा । लालू प्रसाद यादव यांचे ’लाल’ अर्थात चिरंजिव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या सुरक्षा रक्षकांनी बुधवारी सचिवालयाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली. विशेष म्हणजे हा प्रकार घडला तेव्हा तेजस्वी यादव तिथे उपस्थित होते. परंतु त्यांनी सुरक्षारक्षकांना रोखण्याचे कष्ट घेतले नाही.