प्रशासन म्हणते, डोळस आंधळेपणा वास्तविक ताजमहाल हा तेजोमहाल म्हणजेच शिवमंदिर असून याविषयीचे वास्तव ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पु. ना. ओक यांनी संशोधनाअंती भारतीय जनतेसमोर मांडले होते. ओक यांनी त्यांच्या ‘ताजमहाल – द ट स्टोरी’ या पुस्तकातून 100 हून ढळढळीत पुरावे आणि तर्क यांच्या आधारे ताजमहाल नावाची कथित कबर ही मुळात आग्रेश्वर महादेव नागनाथेश्वराचे स्थान म्हणजेच शिवमंदिर असल्याचे ठाम प्रतिपादन केले होते. ‘शहाजहानच्या अनेक बायकांपैकी एक असलेल्या मुमताज हिचे तिच्या 14 व्या बाळंतपणाच्या वेळी निधन झाल्यावर तिचे मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे दफन करण्यात आले.
त्यानंतर 6 महिन्यांनी शहाजहानने महाराजा जयसिंह यांच्याकडून कह्यात घेतलेल्या तेजोमहालमध्ये मुमताज हिची कबर पुन्हा बसवली. जर मुमताज हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते बांधकाम होते, तर मुमताजमधील मुम ही दोन अक्षरे जाऊन केवळ ताज असेच का प्रचलित झाले? जर ती वास्तू प्रेमाचे प्रतीक वगैरे म्हणून शहाजहानने बांधली होती, तर ती कधी बांधली आणि मुमताज हिचा मृत्यू कधी झाला, याचा त्या ठिकाणी उल्लेख का नाही? तेजोमहालच्या नदीच्या बाजूला असणार्या दरवाजाच्या एका तुकड्याचे ‘कार्बन डेटिंग’ केल्यावर तो तुकडा शहाजहानच्या 300 वर्षे आधीचा आहे, हे लक्षात आले होते. ताजमहालाच्या घुमटावर एक त्रिशूल, कलश, आंब्यांची दोन पाने आणि नारळ रेखांकित केलेले आहेत. ही सर्व हिंदू धर्मातील शुभप्रतीके आहेत. मुमताज महालातील कबरीच्या ठिकाणी असलेल्या भिंतींवर फुले-पाने, शंख तसेच ॐ चित्रीत केलेले आहे. त्या ठिकाणी शेकडो खोल्या आहेत. परिसरात गोशाळा आहे. एखाद्या कबरीच्या ठिकाणी हे सारे प्रकार अनावश्यक आहेत. मुसलमानांच्या कोणत्याही इमारतीला ‘महाल’ असे संबोधण्यात येत नाही.
त्या ठिकाणी ज्या संगमरवरी भिंतीवर कुराणातील आयते लिहिली आहेत, ते दगड पिवळसर झाक असलेले आहेत, तर अन्य शुभ्र संगमरवरी आहेत. त्यावरून कुराणातील आयते लिहिलेला भाग नंतर बसवण्यात आल्याचे लक्षात येते. संगमरवरी नक्षीदार जाळीमध्ये 108 कलश चित्रीत केले आहेत. हिंदू धर्मामध्येच 108 आकड्याला विशेष स्थान आहे’, अशा अनेक गोष्टी ओक यांनी पुस्तकामधून छायाचित्रांसह सप्रमाण मांडल्या आहेत. त्या ठिकाणी सध्या बंद (सील) असलेल्या खोल्या उघडण्यात आल्या, तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील, असे सांगण्यात येते. ज्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकालाही लक्षात येऊ शकतात, त्या नाकारून पुरातत्त्व विभाग काय साध्य करू पाहत आहे? वास्तव नाकारून ताजमहालला कबर ठरवण्याचा अट्टाहास का? याला डोळस आंधळेपणा म्हणायचे की पुरातत्त्व विभागाचे हिंदूविरोधी तत्त्व? मुसलमान आक्रमकांनी भारतावर राज्य करताना हिंदू संस्कृतीची अनेक प्रतीके, ग्रंथ, मंदिरे, श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली.
अयोध्येतील राममंदिर, मथुरा आणि काशी येथील देवस्थाने तर अजूनही मुक्त झालेली नाहीत. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र सर्व्हेक्षणाअंती सादर केले आहे की आधीच निष्कर्ष काढून सादर केले आहे? असा प्रश्न त्यामुळे पडतो. सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यकक्षेत पुरातत्त्व अध्ययन आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्मारकांचा शोध, संरक्षण आदी गोष्टी येतात. ही कामे किती सक्षमतेने (?) होत आहेत हे राष्ट्रीय स्मारके, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा केंद्र यांच्या झालेल्या दूरवस्थेवरून लक्षात येते. भारतातील पुरातत्त्व विभाग मात्र ना स्वतः ऐतिहासिक स्मारके, वास्तू, संग्रहालये, ठिकाणे यांच्या संवर्धनासाठी सक्षमपणे काम करतो ना इतरांनी निष्क्रियतेवर बोट ठेवल्यावर त्या सुधारण्याचे कष्ट घेतो!
-चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387