शहादा । अखिल भारतीय माळी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध व हल्ला करणार्यांवर शासनाने कडक कारवाई करावी यासाठी शहादा तालुका आखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.काही समाजकंटकांकडून राज्य मागासवर्ग आयोगाच्या जनसुनावणी वेळी प्रदेशाध्यक्ष लिंगे यांचेवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ घेऊन न्याय्य मागणी करण्यात आली.
निवेदनाचा आशय
राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरु आहे. यासठी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वंतत्रपणे आरक्षण द्यावे अशी भूमिका घेवून ओबीसी समाजाचे नेते आखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे आपल्या ओबीसी कार्यकर्त्यांसह दि. 4 मे रोजी सोलापूर येथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या जनसुनावणी साठी उपस्थितीत होत असतांना काही समाजकांटकांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना धक्काबुक्की करून काळे फासण्यात आले या कृतीचा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याने व समाजातील दुही पसरविण्याच्या या कृत्याचा निषेध करून हल्ला करणार्या समाजकांटकांवर शासनाने कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहादा तालुका आखिल भारतीय माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष घनश्याम माळी, जिल्हा कोषाध्यक्ष विनोद माळी, सहसचिव ईश्वर वारुडे, युवा अध्यक्ष यादव माळी, रोहन माळी, राजेंद्र देवरे, जगदीश माळी, राजेंद्र वाघ, रमाशंकर माळी, पारस माळी, योगेश वारुडे, पंडित जाधव, सी.डी.बोढरे, दिनेश माळी, चंद्रकांत माळी, विजय माळी, आण्णा माळी, अनिल माळी, संतोष माळी, आबा माळी सह महासंघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते.