तेलंगणात चंद्रशेखर राव पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर !

0

हैद्राबाद-आज पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस ) भक्कम आघाडीवर असून टीआरएस ९० जागांवर पुढे आहे.

त्यामुळे चंद्रशेखर राव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहे. टीआरएस एकतर्फी विजय मिळविण्याच्या मार्गावर आहे.