हैदराबाद- तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून साडेतीन हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. ७ डिसेंबर रोजी मतदान तर ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. काल सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. सर्व ११९ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ५८४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार शेवटच्या दिवशी २ हजार ८७ अर्ज दाखल झाले. रविवारी १ हजार ४९७ अर्ज होते.
आज अर्जाची छाननी होणार आहे. २२ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तेलंगणात विधानसभा मुदतीच्या ८ महिने अगोदर विसर्जित करण्यात आली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)ने तातडीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टी यावेळी स्वतंत्र निवडणूक लढत आहे. राज्यात 2,80,64,680 मतदार आहेत, ज्यात 7,46,077 नवीन मतदार आहे.