तेली समाज युवक मंडळातर्फे रास्ता रोको आंदोलन

0

धुळे । दोंडाईचा येथील पीडित बालिकेस न्याय मिळावा, या मागणीसाठी जिल्हा तिळवण तेली समाज युवक मंडळातर्फे काल (दि.25) शहरातील हॉटेल रेसिडेन्सीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

आंदोलकांना अटक व सुटका
दोंडाईचा येथे नूतन विद्यालयात शिकणार्‍या 5 वर्षीय बालिकेवर दि.8 फेब्रुवारी रोजी एका समाजकंटकाने अत्याचार केला. यामुळे बालिका गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या बालिकेस शासनस्तरावर न्याय मिळावा, यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आहे. तसेच बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास त्वरित अटक करावी, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक करून गुन्हा दाखल करावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या खटल्याचे कामकाज अ‍ॅड.उज्वल निकम यांच्याकडे सोपविण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना अटक करून नंतर सोडून दिले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद चौधरी, मनोज मोरे,सतिष महाले, सुनिल नथ्थु चौधरी, विनोद थोरात, कुणाल चौधरी, अ‍ॅड. चंदुबापू चौधरी, दिपक जाधव, मनोज चौधरी, अनिल थोरात, महेश थोरात, महेश बागुल, रविंद्र चौधरी, मनोज चिलंदे, उमेश चौधरी, बबन चौधरी, सागर चौधरी, प्रितम करनकाळ, भैय्या चौधरी व संजय वाल्हे आदी सहभागी झाले होते. अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी, अन्यायग्रस्त बालिकेच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी शहरातील सर्व राजकीय,सामाजिक पक्षातील कार्यकर्त्यांची बैठक आज दि.26 रोजी सायंकाळी 6 वाजता गल्ली नं.2 मधील तेली समाज भवनात घेण्यात आली.