एरंडोल- येथील कासोदा रस्त्यावर पालिका उद्यानाजवळ असलेल्या तेली समाज सामाजिक सभागृहासाठी खासदार ए.टी.पाटील निधीतुन दहा लाख रुपये मंजुर करण्यात आले.सामाजिक सभागृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी मजूर केल्याबद्दल तेली समाजाच्यावतीने खासदार ए.टी.पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. कासोदा रस्त्यावरील पालिका उद्यानाजवळ असलेल्या गट क्रमांक ९८६ मधील प्लॉट क्रमांक २८ व २९ मध्ये तेली समाजाच्या सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. सामाजिक सभागृहासाठी खासदार निधीतुन निधी देण्यात यावा यासाठी भाजपाचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी व भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी खासदार पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी मजूर करण्यात आल्यामुळे समाज बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान तेली समाजाच्या वतीने खासदार ए.टी.पाटील यांचा सामाजिक सभागृहासाठी निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ओ.बी.सी.मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, jसमाजाचे अध्यक्ष निंबा चौधरी, अनिल चौधरी, कैलास चौधरी, सुनिल चौधरी, गणेश चौधरी, वाल्मिक चौधरी, तुकाराम चौधरी, भिका चौधरी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. खासदार निधीच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे खासदार ए.टी.पाटील यांनी सांगितले.