नंदुरबार । नंदुरबार ते अमळनेर प्रवास करून पुन्हा घरी परतल्यानंतर नंदुरबारातील युवकांच्या रोजगाराची आठवण येते का? आ.शिरीष चौधरी यांनी काँग्रेससोबत नगरसेवकपद उपभोगले तेव्हा तरूणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविता का नाही आला ? असा सवाल करीत आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. जळका बाजारात कोपरा सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
दारूशिवाय इतर उद्योग आणा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी जळका बाजारात कोपरा सभा झाली. या सभेत आ.रघुवंशी यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, पारदर्शी आणि निस्वार्थ भावनेतून जनतेच्या सेवेचे व्रत घेतले आहे. तरीही माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. मात्र स्वतःच्या कुटुंबियातील काका, काकू, दादा, बापू अशाप्रकारे आता नंदुरबार नगरपालिकेच्या सत्तेची स्वप्न पाहू लागले आहेत. याचे आत्मचिंतन करून जनतेची दिशाभूल करणे थांबवावा. नंदुरबारच्या युवकांना रोजगार देवून परिवर्तन घडवू असे सांगतात. दारूशिवाय इतर उद्योग आणून दाखवा आम्ही तुमचे नक्कीच स्वागत करू, असे आवाहन आ.रघुवंशी यांनी जाहिरसभेतून केले. शहरातील कोणताही नागरीक आला तरी त्यांचे काम करण्याची निती ठेवली आहे. याच चौधरी समाजातील अनेक गोरगरीब लोकांचे घरे नावावर करून देत नगरपालिका घरपट्टी लागू केली, असे त्यांनी सांगितले.