‘ते’ दोघं कोण? हे जबाबानंतर कळाले

0

जळगाव : तत्कालीन अप्पर अधिक्षक मनोज लोहार यांच्या कॅबीनला गेल्यानंतर पीएसआय निंबाळकरांनी दोघांची जबाब घेण्यास सांगितले. जबाब घेतल्यानंतर यातील एक व्यक्ती पुरुषोत्तम पटेल तर दुसरी व्यक्ती डॉ. उत्तमराव महाजन असल्याचे समजले पोलिस कॉन्स्टेबल अनिल देशमुख यांनी न्यायालयात साक्षीदरम्यान सांगितले. चाळीसगाव विभागाचे तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांनी डॉ. उत्तमराव महाजन यांना डांबून ठेवून खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याचे न्या. पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी आज पीएसआय निंबाळकर यांचे रायटर पोलिस कॉन्स्टेबल आनिल देशमुख व पंच साक्षीदार जगन्नाथ महाजन यांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली.

पंचनामा, स्वाक्षर्‍या ओळखल्या
पोलिस कॉन्स्टेबल अनिल देशमख यांनी दि.30 जुन 2009 रोजी तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांच्या कार्यालयात पीएसआय निंबाळकर यांनी बोलविल्या वरून गेलो होतो. यावेळी त्यांच्या कार्यालयात अगोदरच 2 जण बसले होते. त्यांची आपसात चर्चा सुरु होती. त्यानंतर सायंकाळी 7.30 ते 8.30 दरम्यान पीएसआय निंबाळकर यांच्या सांगण्यावरून लोहार यांच्या कॅबीनमध्ये बसलेल्या दोघांचे जबाब घेतले. त्यावरून यातील एक व्यक्ती पुरुषोत्तम पटेल तर दुसरी व्यक्ती डॉ. उत्तमराव महाजन असल्याचे समजले. अशी साक्ष पोलिस कॉन्स्टेबल अनिल देशमुख यांनी न्यायालयात दिली. पंच साक्षीदार जगन्नाथ महाजन यांनी डॉ. उत्तमराव महाजन यांना तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक योंच्या कार्यालयात ज्या ठिकाणी बसविले होते. तसेच त्यांना ज्या घरात डांबून ठेवले होते. ती जागा, घटनास्थळ पंचनामा करतांना पाहिले होते. व त्याबाबतचा पंचनामा केल्याचे न्यायालयात सांगून पंचनामे, त्यावरील स्वाक्षर्या, मजकूर न्यायालयात ओळखला. या खटल्याचे पुढील कामकाज उद्या दि.6 रोजी होणार असून सरकारतर्फे अ‍ॅड. केतन ढाके, फिर्यादी महाजन यांच्यातर्फे अ‍ॅड. पंकज अत्रे, अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.