तैमुरचा अजून एक विडिओ व्हायरल

0

मुंबई: नेहमीच चर्चेत असणारा स्टारकिड सैफ- करिनाचा लाडका तैमुर अली खान हा कायमच आघाडीवर असतो. त्याच्या फॅशनची नेहमीच खळबळ उडालेली दिसून येत असते. अभिनेत्यांपेक्षाही जास्त तैमुर लोकप्रियता मिळवतो. तैमुरचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडियो अनेकदा सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरतात. नुकताच तैमुरचा असाच एक व्हिडियो व्हायरल झाला आहे.

या विडिओमध्ये तैमूर एका मैदानात बॉलशी खेळताना दिसत आहे. लहान मुलं ज्याप्रमाणे बॉल टाकून त्यामागे पळतात त्याचप्रमाणे तैमुरही बॉलमागे दुडूदुडू पळताना आणि पुन्हा फेकलेला बॉल आणताना दिसत आहे. हा व्हिडियो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच व्हिडियोमध्ये बाजूला लोक बॅडमिंटन खेळत असल्याचे दिसत आहे. तैमुर नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आणि गोंडसपणामुळे वाहवा मिळविण्यात यशस्वी ठरत आहे.