तैमूरचा बर्थडे विकेंड मालदिवमध्ये

0

मुंबई : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि बेगम करिना कपूरचा मुलगा ‘तैमुर’चे स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्याचे अनेक फोटो आणि वव्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच करिना कपूर, सैफ आणि तैमुर यांचे मालदिव येथील फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तैमुरने हिरव्या रंगाची पँट आणि लाल रंगाचे बूट घातल्याचे दिसत आहे. हे नक्कीच समजते कि तैमूरचा स्टारडम काही कमी नाही. तैमुरचा २० डिसेंबर रोजी वाढदिवस असून त्या दिवशी तो २ वर्षांचा होईल. आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी हे तिघेही मालदीवला गेले आहेत.