मुंबई: गतवर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत प्रतिक्रिया देताना तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे असे सांगितले.
”आज दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे. मला वाटत 2007 पर्यत तोंडी परीक्षा नव्हती. त्याचे गुण नव्हते तेव्हा निकाल हा एवढाच लागायचा. मात्र 2008 ते 2018 या काळात तोंडी परीक्षा आणि त्याचे गुण शाळेकडून मिळायचे. त्यामुळे दहावीचा टक्का हा एकदम 16 टक्यांनी वाढला होता.”
आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालांमध्ये ज्यांना कमी गुण मिळले आहेत. त्यांना या महिन्यात अभ्यास करून फेरपरीक्षा देता येईल, नाहीतर कौशल्य विकास अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल, त्यामुळे मार्क कमी मिळले म्हणून निराश होऊ नका, असा सल्लाही शिक्षणमंत्र्यांनी दिला.