तोतया रॉ अधिकारी पालकांच्या ताब्यात : मनोरुग्ण असल्याने केले कृत्य

0

भुसावळ- रॉ अधिकारी असल्याचे भासवून आयुध निर्माणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या युवकाला सुरक्षा रक्षकांनी पकडून मंगळवारी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी या प्रकरणात खोलवर तपास केल्यानंतर ताब्यात घेतलेला संशयीत कल्पतरू सुनील बन्सी (वय 23) हा मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले होते तर त्याचे डील जिल्हा रूग्णालयातील त्वचा रोग तज्ज्ञ डॉ.एस.एस.बन्सी असल्याची माहिती पुढे आली होती. या संदर्भात सुरक्षा रक्षकांनी कुठलीही तक्रार नसल्याचा जवाब बुधवारी शहर पोलिसांना लिहून दिला असून डॉक्टरांनीदेखील आपले पाल्य ताब्यात मिळाल्याचे शहर पोलिसांना लिहून दिल्याने या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. आयुध निर्माणीच्या गेटजवळ कल्पतरुने मंगळवारी गाडी थांबवून त्याने सुरक्षा रक्षकांशी इंग्रजीत संवाद साधत आपण रॉ अधिकारी असून पाहणी करण्यासाठी आो असल्याचे सांगितले होते. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या वरिष्ठांना बोलावले मात्र बन्सीने त्यांना उद्धट वागणूक दिल्यानंतर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी संशयिताच्या वडीलांना बोलावून घेत चौकशी केली होती. दरम्यान, कल्पतरु हा प्रथम वर्ष विधी शाखेचा विद्यार्थी असून कौटुंबिक वादामुळे त्याची मनोरुग्ण म्हणून अवस्था झाल्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले.