अरे माझा शालू कोणी नेला, मला माझा शालू परत द्या.अशी आर्जव सातपुड्यातील काळी आई जणू मानवाकडे करीत आहे.मानवा अजुनहि तुला संधी आहे असा भास सातपुडा व तोरणमाळ परीसरात गेल्यावर जाणवतो.एकेकाळी तोरणमाळ व सातपुडा परीसरात घनदाट अरण्ये होते. त्यात मोठी सागवाणी वृक्ष होती.वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावर होता.बघून नयन तृप्त व्हायचे माञ कोणाची दृष्ट लागली आज सातपुडा बोळखा झाला. वन्यप्राण्यांची संख्या कमी झाली.जे आहेत त्यांच्यासाठी वनविभाग योजना राबवित आहे माञ योजना फोल ठरत आहेत. तोरणामाळ व सातपुडा परिसरात असलेली शेती शिवारांमध्ये आढळून येणा-या वन्य प्राण्यांचा संचार हा दरवर्षी प्रमाणे यंदाही आहे.जंगलात अन्नपाणी मिळेनासे झाल्यावर व्याकूळ झालेले वन्य प्राणी शेती शिवारात आपला मुक्काम ठोकतात.वन क्षेञात वनविभागाने केलेल्या योजना वारंवार फोल ठरत असल्याने सातपुड्यातील या प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका असल्याचे चिञ आहे.सातपुड्याचा जंगलात मोर,तरस,बिबटे,हरिण,अस्वलांसह,ससे आणि शेकडो सरपटणारे जीव वास्तव करतात.
जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांचा रहिवास हरविला
काही वर्षीपूर्वी झालेली जंगलतोडीने या वन्य प्राण्यांची या वन क्षेञातून रहिवास हरवला आहे. कमी झालेल्या प्राणी संख्येत नैसर्गिकरित्या वाढ करण्यात वनविभागाला अजूनही यश आले नसल्याचे चिञ आहे. साग,टेंभूर,सातडा,दहिपुडी,धावडा,बावा या झाडांची बहरलेला या वनक्षेञात या प्राण्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. भौगोलिक आणि जैव विविधता असा संगम असलेला या सातपुड्याचा वनक्षेञात औषधी वनस्पतींच्या शेकडो प्रजाती आहेत. या प्रजातीचे संगोपन करणे आणि त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.राज्यातील इतर वनक्षेञात वनविभागाकडून प्रभावी कार्य होत असताना या वन क्षेत्रात नविन प्रयोगांना जागा असूनही कारवाई झालेली नाही. राज्यातील मोठ्या वन क्षेत्रात वन प्राण्यांचे संगोपन आणि त्याची संख्या वाढ करण्यासाठी होणारे प्रयोग तोरणमाळ सारख्या सातपुड्यात का करण्यात आलेली नाही. वन क्षेत्राच्या परिसरात वावरणारे वन्य प्राणी उन्हाळ्यात अन्नपाण्यासाठी शेतीशिवारांचा रस्ता धरतात. त्यामुळे भयभीत ग्रामस्थांकडून भविष्यात प्राण्यांना ठार मारण्याचे पाऊल उचलले गेल्यास वन्य प्राण्यांच्या संख्येवर परिणाम होईल.वारंवार सपाटीकडील भागात येणार्या वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यासह अन्न मिळाल्यास मानव आंणि प्राणी यांच्यात भविष्यात उदभवू पाहणारा संघर्ष थांबणार आहे.राज्यातील इतर विभागातील वनक्षेञांसारख्याच सोयी व स्वच्छता मिळाल्यास पर्यटकांची गर्दी वाढणार आहे .
पट्टेदार बिबट्याचा संचार
तोरणामाळ आणि सातपुडा वनक्षेञातील पाणवठ्यावर परिसरात निवास करणार्या ग्रामस्थांनी यापूर्वी पट्टेदार बिबट्या व वाघाला पाहिल्याचे सांगण्यात येते. सातपुड्यात पट्टेदार वाघाचे अस्तित्व नसल्याने वनविभागाचे स्पष्टीकरण आहे. पंरतु ठिकठिकाणी ग्रामस्थ पट्टेदार वाघ पाहिल्याचा दावा करतात. पट्टेदार वाघाला पोषक वातावरण आणि संगोपनासाठी सुरक्षित वनक्षेञ असूनही वनविभागाने आजवर उदासीन भुमिका घेतली आहे.तोरणामाळ,धडगाव,वनक्षेञात शेकडो औषधी प्रजातींची झाडे आहेत. यात काही दुर्मिळ वनौषधीही आढळून येतात. याकडे वनविभागाने लक्ष दिल्यास या वनक्षेञात संशोधन शक्य होणार आहे.सागाच्या लाकडासाठी प्रसिद्ध असलेल्या तोरणामाळ परिसरात लाकूड तस्करीवर चाप बसवण्यास माञ वनविभागाला काही प्रमाणात यश आले आहे. बंधार्यातले पाणी आटले.
तोरणामाळ व सातपुड्यात वनक्षेञात प्राण्यांची संख्या वाढविण्याकडे वनविभागचे दुर्लक्ष.
वनक्षेञातील प्राण्यांचा संख्येत घट.
संवर्धनाच्या अभावाने प्राणी नागरी वस्तीकडे.
उन्हाळ्यात अन्नाच्या शोधात असलेले वन्य प्राणी गारवा देणा-या शेतांकडे धाव घेतात.वन्य प्राण्यांसाठी वनांमध्ये पाणवठे आहेत.काही ठिकाणी नैसर्गिक पाणीसाठाही आहे.
मार्ग खंडित
सातपुड्यात 70 च्या दशकात पट्टेदार वाघांची गणना झाली आहे. तोरणामाळ वन क्षेत्रात वाघाचा संचार होता. तोरणामाळ वन क्षेञातून गवत खाणारे हरिण प्रजातीतील प्राणी नामशेष झाल्याने पट्टेदार वाघांचा या वन क्षेत्रातील जीवन जगण्याचा मार्ग खंडित झाला आहे. भविष्यात जिल्हयात वनांचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून अभयारण्य व प्राण्यांसाठी संरक्षित वनक्षेत्र वाढीची गरज आहे.वाघा प्रमाणेच अस्वलाचे अन्न कमी झाल्याने त्याची संख्या बोटावर मोजण्याएवढी झाली आहे. प्राण्यांचा अन्नसाखळीतील वन्यजीव कमी कमी होत असल्याने वन्य प्राणी सातपुड्यातून मुक्काम हलवत आहे वनांत पक्ष्यांचीही परिस्थितीत चिंताजनक आहे.
जिजाबराव पाटील – 9156293031