Two-wheeler slips and falls near Higonna: Adult seriously injured यावल : तालुक्यातील हिगोंणा गावाजवळ एका 58 वर्षीय दुचाकीधारकाचा अपघात होवून गंभीर जखमी झाला. गावातील नागरीकांनी त्यास मदतीचा हात देत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत त्याचे प्राण वाचवले. प्रथमोपचारानंतर त्यास जळगावी हलवण्यात आले.
दुचाकी अपघात प्रौढाला गंभीर दुखापत
यावल-फैजपूर रस्त्यावर हिगोणा गावाजवळून दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 सी.के. 9891) व्दारे यावलकडून फैजपूरकडे ललित रामदास सोनार हे येत असताना तोल गेल्याने ते कोसळले. गावातील हर्षल आंबेकर, इमरान पिंजारी यांनी व हिंगोणा येथील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर, रणजीत भालेराव, शांताराम तायडे यांनी सोनार यांना तातडीने रुग्णवाहिकेतून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावल रुग्णालयात डॉ.जिशान खान, अधिपरिचारीका मंजुषा कोळेकरसह आदींनी प्रथमोचार केले व त्यांना जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवले.