जळगाव । गेल्या दोन महिन्यापासून पुण्यात गेलेला तरुण गावाकडे झेलम एक्सप्रेसने येत असतांना माहेजी-म्हसावद दरम्यान मध्यरात्री 2 च्या सुमारास अचानक तोल गेल्याने पडून गंभीर जखमी झाला. सुदैवाने तो बचावला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत अधिक असे की, अमरसिंग रतनलाल लोढी (वय 27, रा.बायावन, ता.पिसुरे, म.प्र.) हा दोन महिन्यापासून नोकरीनिमित्त गेला होता. काल रात्री 11 वाजता गावाकडे परतण्यासाठी झेलम एक्सप्रेसचे पुणे-भोपालचे तिकीट काढले. एक्सप्रेसच्या जनरल बोगीत गर्दी असल्याने तो दरवाजाजवळ बसला. रेल्वे माहेजी-म्हसावद दरम्यान आली असता मध्यरात्री 2 वाजता अचानक त्याचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. सुदैवाने तो बचावला असून त्याच्या दोन्ही पायांना गंभीररित्या दुखापत झाली आहे. आरपीएफ आनंद सरोदे यांना माहिती मिळाल्यानुसार घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.