त्यांच्या बद्दल सहानुभूती

0

मुंबई । लखनौ हल्ल्यातला अतिरेकी सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारायला नकार दिलाय. सरताज मोहम्मद यांनी या प्रकरणी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. सरताज मोहम्मद यांच्याबदद्ल मी सहानुभूती व्यक्त करतो, असे त्यांनी लोकसभेत सांगितले. सभागृह माझ्याशी सहमत असेल, अशी मी अपेक्षा करतो, असेही ते म्हणाले. सरकारला मोहम्मद सरताज यांच्याबद्दल अभिमान आहे हेही त्यांनी आवर्जून सांगितले. लखनौमध्ये 12 तास चाललेल्या सुरक्षा दलांच्या ऑपरेशनमध्ये सैफुल्ला मारला गेला. कमांडोंनी त्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न केले पण सैफुल्लाने शरण यायला नकार दिला. त्यामुळे त्याला ठार करण्यात आले. सैफुल्लाच्या मृतदेहाजवळ आयसिसचा झेंडा आणि ट्रेनचे टाईमटेबल सापडले. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी या हल्ल्याचा संबंध आहे