नंदुरबार। शहादा तालुक्यातील लांबोळा येथील 62 वर्षीय कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झााला होता. त्या महिलेचा कोरोना अहवाल निगिटिव्ह आला आहे.
मृत महिलेस श्वसनाचा त्रास व अन्य आजाराची पार्श्वभूमी होती. तथापि आरोग्य प्रशासनामार्फत महिलेस श्वसनाचा त्रास असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार या महिलेचा कोरोना विषयी कोणताही प्रवाससाची पार्श्वभूमी नव्हती. महिलेचा स्वाब घेण्यात आला होता.काल रात्री या महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मृत महिलेचे अंत्यसंस्कार कोविड-19 मध्ये नमूद नियमावलीनुसार करण्यात आले, तथापि उपचार करताना आणि अंत्यसंस्कार करतेवेळी प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेण्यात आली होती. कोणतेही काळजीचे कारण नाही.
कृपया कोणीही अफवा पसरू नये असे आवाहन
चेतन गिरासे यांनी केले आहे,