‘त्या’ अपहृत सुरतेत सापडल्या

0

शहादा । तालुक्यातील प्रकाशा येथील राहणार्‍या अल्पवयीन दोन बहिणी 21 मे रोजी रात्री 11 ते 5 च्या दरम्यान गायब झाल्या होत्या. त्यांना अखेर सुरत परिसरातून शहादा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपहरण झालेली मुलगी चंदना संपाराम ठाकरे ही 11 वर्षाची असून ती चौथी पास झाली आहे आता पाचवीत जाईल ,या मुलीने एकाच्या मदतीने आपल्या वडिलांना फोन करून कुठं आहोत या बद्दल माहिती दिली व वडील यांनी लगेच शहादा पोलीस स्टेशन गाठले व कोणत्या नंबर वरुन फोन आला होता त्या नंबर वर पोलिसांनी फोन करून पत्ता मिळविला तो पत्ता सुरत येथील कुसुंबा भागाचा होता.मग पोलिसांनी 26 मे 2018 रोजी सापळा रचून रात्री 8 वाजेला शिताफीने आरोपी प्रकाशा येथील गो शाळा सेवक बबन पावरा बाबा यास अटक करून मुलींची सुटका केली.त्याला आज शहादा पोलीस स्टेशनला आणले.

पालकवर्ग धास्तावलेलाच…
याबाबत अधिक माहिती अशी की,मागील आठवड्यात प्रकाशा येथील या दोघा अल्पवयीन बहिणींचे अचानक रात्री नाहीसे झाल्याचे दिसून आल्याने त्यांचा शोध मुलींचे वडील संपाराम ठाकरे व आई सुरमी यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काही सापडल्या नाहीत ,शेवटी आई वडील यांनी शहादा पोलीस स्टेशनला मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार केली.त्या अनुषंगाने पोलीस मुलींचा शोध घेऊ लागले. सध्या शहादा शहर व तालुक्यात मुलं हरविण्याचे ,पळवून नेण्याचे प्रमाणे वाढलेले आहे.म्हणून पालक देखील धास्तावलेले आहेत.त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले काम चोख करावे व अपहरणाच्या होणार्‍या घटनांवर आळा बसावा अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

चिमुरडीने सांगितले ‘आपबीती’
चंदना संपाराम ठाकरे ह्या मुलीने आपली आपबीती पोलिसांना सांगितली की, वैजाली येथील बुंदेश्‍वर आश्रम शाळेत शिकते. मी 4 पास झाली असून आता परीक्षा झाल्याने मी गावी प्रकाशाला आली. शेजारी राहणारे गो-शाळा सेवक बबन पावरा मला व आम्हा भाऊ बहिणींना तो नेहमी खाऊ द्यायचा. 5-6 दिवसापूर्वी बबन पावरा बाबा याने रात्री मला व बहीण योगिता हिला सांगितले होते की, आपल्याला उद्या सकाळी माझ्या जुन्या गावी जायचे आहे.तेथे माझी बिल्डिंग आहे.गायी आहेत, शेत आहे,तेथे मी तुम्हाला सोन,चांदी घेऊन देणार तेव्हा आम्ही तुमच्या सोबत येणार नाहीत असे सांगितले ,तेव्हा त्याने आम्हाला सांगितले की, मी तुम्हाला मारून टाकेन व मी पण मरून जाईल असे सांगून ही गोष्ट आई वडिलांना सांगायची नाही असे सांगितले म्हणून ही गोष्ट आम्ही कोणालाच सांगितली नाही. ते दुसर्‍या दिवशी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास आमच्या घरी आले.तेव्हा आई झोपलेली होती व वडील गावात गेलेले होते.तेव्हा आम्ही उठून बबन बाबाच्या सांगण्यावरून कोणालाच न सांगत बबन बाबाच्या सोबत बाहेर पायी वाका चार रस्त्यापर्यंत गेलो. तेथून तळोदा कोणाच्या तरी घरी जेवलो व तेथून कोठेतरी दोन दिवस मुक्काम केला.त्या नंतर दुसर्‍या ठिकाणी नेले. सांगितले की, आपण गुजरातमध्ये आहोत.दोन तीन दिवस झाल्यानंतर एका दर्ग्याच्या ठिकाणी बाबा बाहेर गेला असता आम्हा बहिणींना रडताना एक व्यक्तीने विचारलेवर मी त्यांना माझ्या वडिलांच्या नंबर वर फोन करायला सांगितले .मी वडिलांजवळ बोलली.

आरोपीस घेतले ताब्यात
तुम्हाला काही त्रास दिला का? शरीराला,त्याने अगर इतर कोणी हात लावला का?तर कोणीही व इतर व्यक्तीने हात लावलेला नाही.अशी माहिती या मुलींनी पोलिसांना दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पो. नि. संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उ.पो.नि.ज्ञानेश्‍वर बडगुजर, पोलिस.राहुल निराळे, मनिलाला पाडवी मनोज महाजन यांनी सुरत येथे जाऊन घटनास्थळी सापळा रचून अपहरणकर्ता बबन भिमा पावरा वय 60 यास दोघे मुलींसह ताब्यात घेतले.