‘त्या’ उमेदवारांना बजावली नोटीस

0

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत खर्चाचा तपशील न देणार्‍या तब्बल २०७ उमेदवारांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

महानगरपालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. यात ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांनी निवडणुक लढविली परंतु निकाल लागल्यानंतर १५ दिवस उलटूनही निवडणुकीचा खर्च उमेदवारांकडून सादर केला जात नसल्याने मनपा प्रशासनाकडून नोटीसा बजावियात आल्या आहेत. यापुर्वी नोटींसा बजाविण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला होता. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना ६० दिवसांची मुदत असते तर, अपक्ष उमेदवारांना आपला निवडणुक खर्च सादर करण्याकरीता ३० दिवसांची मुदत निवडणुक आयोगाने दिले आहे. मात्र, ही मुदत संपण्याआधीच नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.