‘त्या’ गुन्ह्याप्रकरणी शासनाकडे तक्रार

0

भुसावळ । येथील जनता को ऑप कन्झुमर्स स्टोअर्स संस्थेचे राजेश उपाध्याय यांनी संस्थेच्या नावाने केरोसिन परवान्यावर रॉकेलची उचल करुन त्याची काळाबाजारात विक्री करुन अपहार केल्यासंदर्भात त्यांच्यावर बनावट दस्तऐवजांच्या आधारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गिरनारे यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली असून नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

राजीनामा देऊनही केले आरोपी
पुरवठा अधिकारी रविंद्र जाधव यांनी 28 सप्टेंबर 2016 रोजी पोलीसात तक्रार दाखल केली त्यात त्यांनी अ‍ॅड. राजेश उपाध्याय यांना आरोपी करुन उपाध्याय यांनी आपल्या संस्थेच्या जानेवारी 2012-13 या कालावधीत केरोसिन उचल करुन शिधापत्रिका धारकांना वितरीत न करता काळ्या बाजारात विक्री करुन अपहार केल्याचे नमूद केले आहे. फिर्यादीत इतर आरोपी म्हणून आदर्श स्वस्त धान्य दुकान असोशिएशनचे चेअरमन म्हणून मृत्यूंजय उपाध्याय यांना आरोपी केले आहे. व 96 हजार 120 लिटर रॉकेलचा काळाबाजार करुन 48 लाख अपहार केला असे आरोप लावण्यात आले आहे. मात्र राजेश उपाध्याय यांनी 2010 मध्येच चेअरमन पदाचा राजीनामा दिला असून याची माहिती 16 मे 2011 व 22 ऑगस्ट 2016 रोजी दिल्यानंतरही त्यांना कोणताही पुरावा नसताना खोटे बनावट दस्तऐवज बनवून खोट्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असल्याचे गिरनारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच आर.एच. जाधव, रामकिसन राठोड, डॉ. हरिष भामरे, व इतरांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन राजेश उपाध्याय यांना नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपये देवून संबंधित रक्कम वसुलीची मागणी केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे तपास अधिकार्‍यांनी न्यायालयासमोर कबुली दिली आहे की, गुन्हा कालावधीत राजेश उपाध्याय हे वरील संस्थेचे चेअरमन नव्हते.