लंडन । कोहलीचा आक्रमकपणा वाढलाचॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन देशभर सुरू आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीतही विराट अधिक आक्रमक झाला होता,फलंदाज बाद होत पणे धावा थांबत नव्हत्या. त्यामुळे विराट आपला संयम कधी-कधी सोडतो. बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद करण्याच्या प्रयत्नात धोनीकडून अतिरिक्त पाच धावा गेल्या. ही ‘चूक’ विराटला खटकली आणि त्याने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.
माझ्यासाठी खूप मोठे यश
बांगलादेशाच्या चाहत्यांना भारतीय फलंदाजांनी चोख उत्तर दिले. भारताने आक्रमक खेळ केला. त्यात कॅप्टन कोहली आघाडीवर होता.केदार जाधवच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या फलंदाजाचा अप्रतिम झेल टिपल्यानंतर कोहलीने केलेला जल्लोष अधिक लक्षात राहिला. धोनीकडून चूक झाली. अश्विनने 40वे षटक बांगलादेशच्या फलंदाजाने टोलवलेला चेंडू युवराजने विकेटकीपर थ्रो केला. धोनीने बांगलादेश फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न फसला. धोनीने स्टम्पवर फेकलेला चेंडू तेथे ग्लोव्हजवर लागला आणि बांगलादेशला अतिरिक्त पाच धावांचे बक्षीस मिळाले. धोनीकडे पाहून त्याने आपला राग व्यक्त केला. आणि काहीतरी पुटपुटला. कोहलीने राग व्यक्त केल्यानंतर धोनीचे चाहते मात्र नाराज झाले.