‘त्या’ दरोडेखोरांकडून 50 हजारांची रोकड जप्त

0

भुसावळ- खंडवा येथील लाकडाच्या व्यापार्‍याची पाच लाखांची रोकड लुटून भुसावळात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या आंतरराज्यातील टोळीतील आठ आरोपींना बुधवारी पहाटे महामार्गावरील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली होती. आरोपींच्या ताब्यातून तीन लाखांची रोकड, चाकू, मिरची पूड, स्क्रु ड्राव्हर, पकड या दरोड्याच्या साहित्यासह दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना रविवार, 21 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस तपसात डॉ.शेषराव पांडुरंग राठोड याने चारचाकी (क्रमांक एम.एच.30 ए.एफ.4902) च्या मागील सीटवर बसणार्‍या प्रवाशाच्या पायदानाच्या ठिकाणी मॅटखाली केलेल्या खड्ड्यात 50 हजारांची लपवलेली व हिश्यावर आलेली रक्कम काढून आली. दरम्यान, तक्रारदाराच्या ताब्यातून आरोपींनी पाच लाखांची रोकड लांबवल्याची माहिती असून उर्वरीत दिड लाखाचे आरोपींनी काय केले? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रेल्वे हद्दीतील गुन्ह्याची तक्रारदार आल्यानंतर होणार उकल
याच प्रकरणातील तक्रारदार असलेल्या शंकर बिरबल पासी (लंकड बाजार, खंडवा) यांच्या ताब्यातून लोहमार्ग पोलिसासह दरोड्यातील संशयीत आरोपी असलेल्या दोघांनी पाच लाखांची रोकड लांबवल्याचा लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल आहे मात्र तक्रारदार पोलिस ठाण्यात येवून जवाब देत नाही तोपर्यंत या गुन्ह्याची उकल होणे शक्य नाही, असे लोहमार्ग पोलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले.