‘त्या’ पॉझिटिव्ह महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू

0

नंदुरबार: शहरातील अहिल्याबाई होळकर विहीर परिसरातील त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दिली. महिलेची प्रकृती गंभीर होती. शुक्रवारी, 8 मे रोजी कोविड 19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, गुरुवारी, 7 मे रोजी तालुक्यातील आष्टे गावात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 68 वर्षाच्या महिलेचा आणि 8 मे रोजी म्हणजे दुसर्‍याच दिवशी नंदुरबार शहरातील अहिल्याबाई होळकर परिसरात राहणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेची संपर्क साखळी मोठी असल्याने खळबळ उडाली आहे. त्या अनुषंगाने प्रशासन संपर्क साखळीतील लोकांचा शोध घेत आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या आजी सोबत आणखी एक महिला उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.