त्या पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करावे

0
युवक काँग्रेसची पोलीस आयुक्तांना मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस आयुक्त डॉ.पद्मनाभन यांची भेट घेतली. सोलापुर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ संबंधीत कर्मचार्‍यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, करणसिंग गील, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिरा जाधव, अजय मोरे आदि पदाधिकारी शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, सोलापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व संबंधितांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना नागरिकांमधील रोष व आक्रोश व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्याच्याकडेला थांबून जनसामान्यांच्या प्रश्‍नांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी काळे झेंडे हातामध्ये  घेऊन आंदोलन करीत होते. त्यावेळी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. याचा सर्व देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. युवक काँग्रेस संघटन हे कायमच जनतेच्या प्रश्‍नांवर आवाज उठवित आलेले आहे. कार्यकर्ते आपले कर्तव्य बजावीत असताना त्यांना मारहाण होणे हे मानवतेला काळीमा फासणारे कृत्य आहे. निरपराधांना अशी अमानुष मारहाण करणे हेच बेकायदेशीर आहे. तरी त्या अमानुष कृत्य करणार्‍या त्या अधिकार्‍यांना निलंबित करुन त्यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल करावेत.